अटलजींच्या शोकसभेला विरोध करणारा वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन शिवसेनेच्या छायेत ?

Foto

औरंगाबाद- ऑल इंडिया मजलीस इत्तेहाद ऊल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) वादग्रस्त व पक्षातून हकालपट्टी केलेले नगरसेवक सय्यद मतीन यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी पक्षातील नेत्यांवर पलटवार केला होता, तेव्हा पासून अज्ञातवासात गेलेले मतीन आज ( सोमवारी दि.14 ) स्थायी समितीच्या बैठकीत चक्क शिवसेना- भाजप पदाधिकाऱ्यांसह बसल्याने मनपासह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मतीन सय्यद शिवसेनेत प्रवेश करणार का अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

 

नेहमी आपल्या वादग्रस्त कृतीने  चर्चेत राहणारे नगरसेवक मातीन यांची  एमआयएम मधून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी एमआयएम नेत्यांवर जोरदार टीका करीत पक्षाची उलटी गिनती सुरु झाली असल्याचा इशारा आपल्या खास शैलीत दिला. त्यानंतर मनपाच्या सर्वसाधारण सभेत आले असतांना  मतीन यांना सभागृहातुन बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर अज्ञातवासात गेलेले मतीन आज सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी लावलेली हजेरी सर्वानाच चकित करणारी होती, यावेळी चक्क ते खासदार पुत्र ऋषिकेश खैरे व आमदार पुत्र सिद्धांत शिरसाठ या दोघांच्या मध्ये बसले. 


सत्ताधारी पक्षाच्या बाकावर ते बसले असल्याने मतीन शिवसेनेच्या छायेत बसणार आहेत का या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. यावेळी एमआयएम च्या सदस्यांच्या भुवया उंचावल्या. यावेळी स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनीही तुम्ही आज या बाजूने बसलात चांगली गोष्ट आहे. असे म्हटले यानंतर मतीन यांनी प्रश्न  मांडताच आप इधरसे बैठे हो आपका काम हो जायेगा असे वैद्य यांनी  म्हणताच सभागृहात हशा उडाला. या प्रकाराने मनपासह राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले. खासदार खैरेंनी सध्या पक्षात येण्यासाठी इच्छुक लोकांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मतीन शिवसेना पक्षात प्रवेश करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker